उपरे
वर्ष २०१३ असावं. दिल्लीत आयुष्यात पहिल्यांदा सायकल रिक्षा पाहिली. आणि ती रिक्षा ओढणारे ते कळकट, मळकट, खप्पड, फाटके, anaemic, तरुण म्हातारे, म्हातारे वाटणारे तरुण आणि त्रयस्थ अंग टाकून बसलेली ती सवारी नावाची भानगड बी पैल्यांदाच पहिली. प्रथमदर्शनी एका माणसाने दुसऱ्या माणसाचं ओझं दोन पैश्यांसाठी ओढणं म्हणजे अमानुष वाटलं. हीन. दयनिय वैगेरे. पण मग उमगलं, दिल्ली म्हणजे विसंगत गोष्टींचीच राजधानी. एकतर टोकाचं दारिद्र्य, नाहीतर असाह्य समृध्दी. नवीन असाल तर डायरेक्ट वैफल्य वैगेरे येतंय. हे सगळं पाहून मी लागलीच ठरवून टाकलं, भंगार जीव गेला तरी चालन, पण यांच्या उरावर बसायचा पाप करायचं नई!
भारतात गरिबी दिसती तशे हे कुढंबी दिसत्यात. मेट्रो स्टेशनाच्या खाली, एखाद्या मुतारीच्या कोपर्यावर, एखाद्या supermart च्या बाहेर, नैतर रिक्षातच तोंडावर गम्छ्या टाकून लवंडलेले नसले तर मग गुडघ्यावर बसून बिड्या फुकत वासनांध लिंगपिसाट नजरेने स्त्रियांना डोळ्यांनी टवकारतांना तर दिसत्यातच! क्रियाशून्य डोळ्याने गिऱ्हाईक शोधणारे, लंगर लावतील तिथं उभ्यानेच घास गिळणारे, एकाच खोलीत १५-२० जण राहून २०० रुपय भाडं देणारे, फुफाटलेला रस्त्याची चटई आणि कार्बनचं आभाळ घेऊन झोपणारे, सार्वजनिक शौचाला पाच, अंघोळीला पाच अन उरलेले फुटके रुपय घरी पाठवणारे हे रिक्षावाले तुम्हाला सर्वत्र दिसतील. तुम्ही यांना टाळणं निव्वळ अशक्य.
एकदा भर उन्हात कुठंतरी जायला उशीर झाला म्हणून मित्राने हट्टच केला की ही सायकल रिक्षा करूयात. मी पण आडून घंटया बसत नसतो म्हणत ती गुलामी करवून घेणार नई म्हणालो. यावर तो म्हणाला, शेतात शेतमजूर पण राबतोच की नई? हमाल पोते उचलून हमाली करतोच की नई? अन ते स्टेशनावर कुली ओझे वाहतोच ना? मंग हे बी त्यातलंच एक. भिक तर मागत नई ना? म्हणून घाई नसली आणि जवळचा पल्ला असल तर यांना प्राधान्य द्यायचं. नैतर उपाशी मर्त्याल लका ही लोकं. मला पटलं. मग बसलो. पण बुड असं अधांतरी धरून. म्हंटल लई नको वजन टाकायला. Gravity वगैरेला अर्थातच जागेवर घोडे लागले. आणि मला बारावी नंतर घरच्यांनी science काहून सोडाय लावलं ते एकंदर पटलं. पण दोन-एक किलोमीटर गेल्यानंतर चढ आल्यावर, त्याला मी खाली उतरून सायकल लोटू लागलो. पैसे पण जरा वाढवूनच दिले.
एकदा भर उन्हात कुठंतरी जायला उशीर झाला म्हणून मित्राने हट्टच केला की ही सायकल रिक्षा करूयात. मी पण आडून घंटया बसत नसतो म्हणत ती गुलामी करवून घेणार नई म्हणालो. यावर तो म्हणाला, शेतात शेतमजूर पण राबतोच की नई? हमाल पोते उचलून हमाली करतोच की नई? अन ते स्टेशनावर कुली ओझे वाहतोच ना? मंग हे बी त्यातलंच एक. भिक तर मागत नई ना? म्हणून घाई नसली आणि जवळचा पल्ला असल तर यांना प्राधान्य द्यायचं. नैतर उपाशी मर्त्याल लका ही लोकं. मला पटलं. मग बसलो. पण बुड असं अधांतरी धरून. म्हंटल लई नको वजन टाकायला. Gravity वगैरेला अर्थातच जागेवर घोडे लागले. आणि मला बारावी नंतर घरच्यांनी science काहून सोडाय लावलं ते एकंदर पटलं. पण दोन-एक किलोमीटर गेल्यानंतर चढ आल्यावर, त्याला मी खाली उतरून सायकल लोटू लागलो. पैसे पण जरा वाढवूनच दिले.
बरं हे प्रकरण झालं अन मी बेशुमार सायकल रिक्षा वापरू लागलो. अधिकारवान्या आवेशात हातवारे करून त्यांना बोलवू लागलो. हिकडं तिकडं जायचंय मागं रेलून सांगू लागलो. पण म्हणतील तेवढी रक्कम टेकवून मोकळा व्हायचो. त्यांच्या काळजीनं चौकश्या करायचो. कारण ही जमात तशी उपेक्षितच. सायकल चुकीची पार्क केली असल्यास किंवा अचानक चुकून एखाद्या चारचाकी समोर आल्यास तत्सम शिव्या खाणारी, वेळेस लाथा बुक्क्या निमुटपणे पेलून घेणारी, दमडी भर अल्पवयीन मुलांची feudal आरे कारे ची भाषा ऐकून घेणारी हि जमात. बरं अश्यात पाच दहा रुपयांवरून हुज्जत घालणाऱ्या उच्चभ्रू स्त्रिया पाहिल्या की मला बोल्शेविक क्रांती घडवून आणावी वाटल्याशिवाय रहात नई. महाराष्ट्रात धक्का लागले तरी तोंड हाणणारे रिक्षावाले आठवले कि या सगळ्याचं अप्रूप वाटतं. मराठी समाजतला political mobilisation असावं किंवा मग एक समाज म्हणून एक आपला कलेक्टीव कॉन्शिंस आपल्याला असं काही करू देत नसावा. पण यांची अवस्था लय बेक्कार. विषण्ण करून टाकणारी.
एक दिवस असाच अभ्यासिकेत असताना रात्री अकरा वाजता शिव्या-गाळया ऐकू आल्या. खात्रीशीरपणे आवाज आमच्या बच्चनचा होता हे मी हेरलं. कसंय UPSCचा अभ्यास म्हणजे एक परीघ असतंय. म्हणून परिघात पण एक सातत्य असतंय. तेच चहावाले, तेच रस्ते, तेच माणसं अन तेच रिक्षावाले. या कंटाळवाण्या परिघात कायतरी किडे करायचे म्हणून अश्या या लोकांचे, मी आणि Sushil Kharat नावं ठेवत असू. म्हणजे हा बाबा ठाकूर, तो बच्चन, तो डोंगल, तो खिलजी, तो खैर्या, तो बांड्या, असं सगळं! तर, तो बच्चनचाच आवाज होता. आमचा बच्चन रिक्षा चालवायचा. एरवी तो शांत, केविलवाणा दिसायचा. महिन्या दोन महिन्यातून एकदाच तो वस्तार्यानी डोकं आणि दाढी घोटायचा. म्हणून त्याचा सावळा रंग उन्हात अधिक चमकायचा. हे तो दाढी-कटिंगचे पैसे वाचावे म्हणून करत असावा. तर, आमचा बच्चन रिक्षा चालवायचा. म्हणजे एखाद दोन दिवसच. मंग तो गांजा मारून अर्धनग्न अवस्थेत मोठ मोठ्याने बच्चनचे तोंडपाठ डायलोग फुकत रस्तोरस्ते पालथे घालायचा. म्हणून तो आमचा बच्चन. एकदम बेछुट. सगळ्यांच्या आया बहिणी काढायचा. म्हणजे मिठाईवाल्यांपासून पासून पार पानवाल्यांपर्यंत अन mercedes पासून रिक्षावाल्यांपर्यंत कोणालाच सुट्टी नाय. बरं त्यानी कोणाची हाणलीच तरी त्याला प्रतीउत्तर मात्रं येत नसत. शिव्या खाऊन लोक ओशाळून मान खाली घालून पुढे जात असत. यामुळे त्याला तो सर्वेसर्वा असल्याची अनुभूती येत असावी. मग त्याला आणखी चेव येत असावा. तो नशेत नसतांना त्याची चर्या पाहून अख्खा जन्म ओतला तरी गरिबी मिटणार नई असे त्याचे भाव असत. पण त्यानी जरका एकदा गांजा मारला, तर एकदम से जझबात बदल जाते थे. म्हन्श्यान ती योजना झकमारील एवढी पन्नास रुपयचा गांजामुळे त्याचं सबलीकरण व्हायचं.
तर, हे शिवीगाळ प्रकरण आता अभ्यासात व्यत्यय यावा एवढं पेटलं. न राहवून मी बाहेर आलो. पाहतो तर बच्चन आणि बाकी बुच्चनांची तुफान टाकाटाकी जुंपली होती. अंधाराच्या दिशेने नुसतेच फटक्यांचे आणि कण्हण्याचे आवाज येत होते. निर्मनुष्य रस्त्यातल्या गडद काळोखात हि दंगल सोडवणारा कोणी मल्लं नसल्याने पळत जाऊन मी डायरेक्ट त्यांच्यात कुद्लो. अंडे मटण चेचून बळावलेला मी त्यांना खडे वेगळे कराव तशे बाजूला केले. अशात, उर्वरित झटापटीत मला एक फटका पडला. क्षणभर काय झालं कळलंच नई. आणि कळायला लागल्यावर एखाद्या ग्रीक ट्राजेडी मधला प्रोटागोनीस्ट बावचळावा तसे मग मी पुढचा काही वेळ अजून दोन तीन जण हाणत सुटलो. मंग अचानक आठवलं हे काय आपलं भांडण नई! मंग मी थांबलो. मंग दम खाऊन भांडणाचं कारण विचारलं असता कळालं बच्चन दुसर्या एका रिक्षा ओढणाऱ्याला उपहासानं बिहारी म्हणाला. मग तो पण याला बिहारी म्हणाला. म्हंटला मंग? म्हणे मंग हेच. मंग झालं भांडण. मंग मी इकडं तिकडं बघत घाम पुसत निश्वास सोडला. बरं विशेष म्हणजे दोघंबी बिहारीच. बिहारीच बिहाऱ्यांना बिहारी म्हंटला म्हणू टोलवू लागलेत हे गणित काय आपल्याला कळलं नई. पण मंग त्या निमित्ताने बिहारी हाणले गेले म्हणून आपलं मराठीपण जपता आलं याचं समाधान वाटलं. मंग मी तिथून जाऊन पुन्हा अभ्यासाला लागलो. गांधी, अहिंसा वगैरे असलं काहीतरी मी जाऊन वाचलं असावं.
आत्ता-आत्ता असाच lockdown पडायच्या आधी मार्केट मध्ये हिंडत असताना एका रिक्षावाल्याने माझ्या डाव्या हाताच्या बोटाला येऊन handle ची टक्कर मारली. म्हणजे समस्त बॉडी सोडून फक्त डाव्या हाताच्या मधल्याच बोटाला टक्कर मारता येणं म्हणजे दैवी साधनाच म्हणाय पायजेलंय. त्यानी कस्काय जमवलं माहित नई, पण जमलं. कण्हत विव्हळत, ठोस मारली त्या हातातून निसटलेला फोन उचलला. त्याच्याकड फिरत त्याला घोडा लावणार एवढ्यात उमगलं तो आमचा बच्चन आहे. तब्बल तीन वर्षांनी आज तो दिसला. अधिक खोबणीत गेलेले डोळे. अधिक खप्पड गाल. आणि आता अधिक म्हातारा बी दिसू लागला होता. माझी आग बघून, उम्मेद मरून तिरड्या उठाव्या आणि टाहो फोडत आवाज बाहेर पडावा असं जबर दुख त्याच्या डोळ्यात तरळलं. कळायच्या आत मी मागे सरावलो. थबकून मग मी उलटा फिरलो. मान खाली खोचून मी बोट चोळत चालू लागलो. बोट तसंच दुखत राहिलं.
अजूनही मी असं रूम मध्ये येरझऱ्या घालत त्या माझ्या मधल्या बोटाला iodex चोळताना दिसतो. एकदा रूम मेटने विचारलं नेमकं मधलंच बोट कसकाय दुखतयं? म्हणजे नेमकं कुठं घातलं होतं? उत्तर मी अजूनही शोधतोय!
अजूनही मी असं रूम मध्ये येरझऱ्या घालत त्या माझ्या मधल्या बोटाला iodex चोळताना दिसतो. एकदा रूम मेटने विचारलं नेमकं मधलंच बोट कसकाय दुखतयं? म्हणजे नेमकं कुठं घातलं होतं? उत्तर मी अजूनही शोधतोय!
Comments
Post a Comment